नंदुरबारचे समूह नृत्य राज्यस्तरावर प्रथम

लातूर येथे आयोजित राज्यस्तरीय लोककला स्पर्धेत नंदुरबारच्या मुलींच्या संघाने समूह नृत्य गटात संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च पारितोषिक पटकावले आहे.
नंदुरबारचे समूह नृत्य राज्यस्तरावर प्रथम
state-level-group-dance-competition-nandurbar-first
  • विजेता संघ: नंदुरबार तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, होळ तर्फे हवेली येथील विद्यार्थिनींच्या संघाने हे यश मिळवले.
  • स्पर्धा व ठिकाण: बालरंगभूमी परिषदेच्या वतीने लातूर येथे ‘जल्लोष लोककलेचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांतील बालकलाकारांनी सहभाग घेतला होता.
  • नृत्याचे वैशिष्ट्य: खान्देशातील या विद्यार्थिनींनी कोकणात गणेशोत्सवात खेळले जाणारे पारंपरिक ‘टिपरी नृत्य’ सादर करून उपस्थितांची व परीक्षकांची मोठी दाद मिळवली.
  • मार्गदर्शन: शाळेच्या अधीक्षिका सुषमा मोरे यांनी या नृत्याचे उत्कृष्ट दिग्दर्शन केले होते.
  • पुरस्कार वितरण: बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायक मंगेश बोरगावकर आणि परिषदेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: