तालुक्याबाहेरील दस्तनोंदणीसाठी आता सहजिल्हा निबंधकांची पूर्वपरवानगी बंधनकारक!
राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना आणि बोगस दस्तनोंदणीला आळा घालण्यासाठी शासनाने 'एक जिल्हा एक नोंदणी' योजनेअंतर्गत कठोर नियमावली जारी केली आहे. आता स्वतःच्या तालुक्याबाहेरील मालमत्तेची दस्तनोंदणी दुसऱ्या तालुक्यात करण्यासाठी सहजिल्हा निबंधकांची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.
- गैरप्रकारांना बसणार चाप: पूर्वी ‘एक जिल्हा एक नोंदणी’ मुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता, परंतु काही व्यक्तींनी याचा गैरफायदा घेत सरकारी जमिनी, आरक्षित भूखंड आणि बोजा असलेल्या मालमत्तांची इतर तालुक्यांत जाऊन बोगस नोंदणी करण्याचे प्रकार केले. नव्या नियमामुळे अशा बोगस जमीन विक्री करणाऱ्या भूमाफियांवर चाप बसेल
- कठोर तपासणी आणि प्रक्रिया: तालुक्याबाहेर दस्त नोंदवायचा असल्यास, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. संबंधित दुय्यम निबंधक प्राथमिक कागदपत्रांची पडताळणी करतील . मालमत्ता शासकीय किंवा शासकीय प्रकल्पांसाठी आरक्षित नाही ना, याची सखोल चौकशी केली जाईल.
- १० दिवसांत मंजुरी किंवा नकार: कागदपत्रे कायदेशीर आणि योग्य आढळल्यास, हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी दोन दिवसांच्या आत सहजिल्हा निबंधकांकडे पाठवला जाईल. त्यानंतर सहजिल्हा निबंधक सखोल तपासणी करून दोन दिवसांत परवानगी किंवा नकार देतील
- शासकीय जमिनींच्या व्यवहारांना आळा: शासकीय जमिनी, वनक्षेत्र किंवा कायदेशीर बोजा असलेल्या मालमत्तांची परस्पर विक्री रोखण्यासाठी आणि जमीन व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे
Follow Us:

