Home महाराष्ट्र पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा

0
Take advantage of the Prime Minister's Micro Food Processing Industry Scheme

(नंदुरबार) जिल्ह्यातील शेतकरी, महिला उद्योजक आणि युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ (PMFME) योजनेअंतर्गत विविध पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

कोणाला घेता येईल लाभ?

या योजनेत फळे, भाजीपाला, अन्नधान्ये, कडधान्ये, मसाला पिके, मत्स्य, दूध आणि किरकोळ वन उत्पादनांवर आधारित उद्योगांचा समावेश आहे. वैयक्तिक लाभार्थी, युवक शेतकरी, महिला उद्योजक, कारागीर आणि भागीदारी संस्थांसोबतच स्वयं-सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि सहकारी संस्था देखील यासाठी पात्र आहेत.

मिळणारे अर्थसाहाय्य आणि अनुदान

• वैयक्तिक लाभार्थी: भांडवली गुंतवणुकीसाठी 35 टक्के अनुदान (कमाल 10 लाख रुपयांपर्यंत)

• मार्केटिंग व ग्रेडिंग: यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

• बीज भांडवल (Seed Capital): स्वयं-सहाय्यता गटातील सदस्यांना प्रति सदस्य 40 हजार रुपये बीज भांडवल दिले जाईल.

• गट लाभार्थी: सामायिक पायाभूत सुविधांसाठी 35 टक्के अनुदान उपलब्ध असेल.

• प्रशिक्षण: लाभार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया कशी असेल?

• वैयक्तिक लाभार्थी: www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात .

• गट लाभार्थी: संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

• बीज भांडवलासाठी: ग्रामीण भागातील उमेद (MSRLM) किंवा शहरी भागातील MSULM

कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेत स्थानिक पारंपारिक उत्पादने आणि भौगोलिक मानांकने (GI Tag) प्राप्त उत्पादनांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा नजीकच्या कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मदतीसाठी 9404048912 किंवा 8275522240 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये आहे.