मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न

मुंबई:-राजापूर तालुक्यातील मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ मुंबई मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा गौरव करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात (2025-26) इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर तसेच तत्सम परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न
The 2026 Student Merit Felicitation Ceremony of the Mauje Devihasol Kunbi Vikas Mandal, Mumbai, concluded with great enthusiasm.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून गावदेवी विद्या मंदिर डोंबिवली (प) शाळेच्या शिक्षिका सौ. सुप्रिया रविंद्र भोवड उपस्थित होत्या.समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व समाजबांधव, भगिनी, पालक व सभासदानी या समारंभाला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देण्यात आले
हा गुणगौरव सोहळा 30 ऑगस्ट 2026 रोजी सायं 4 ते 8 या वेळेत शारदाश्रम विद्या मंदिर, डॉ. भवानीशंकर दादरकर मार्ग, दादर ( प. ) 400 028 येथे पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष- केशव पु. भोवड, कार्याध्यक्ष संतोष रा. भोवड, सेक्रेटरी अविनाश हि.भोवड,
खजिनदार योगेश तु.पैकडे आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250