आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

राजापूर:-श्री.देव चंडिका, श्री. ब्राम्हणदेव, श्री.देव रामेश्वर ट्रस्ट आंगले आणि आंगले ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण देव प्रतिष्ठापना सोहळा 30 ऑगस्ट रोजी ग्रामस्थ व मुंबईकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुरोहितांनी मंत्रोच्चार करत देवाच्या मूर्तीत चैतन्य प्राणशक्तीचे आवाहन करत विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

या कार्यक्रमाला आंगले गावचे  गावकर  बाळकृष्ण सौंदाळकर, श्रीधर सौंदाळकर, अनंत राऊत,विजय, राऊत, अनंत सरवणकर, विष्णू मांजरी, रूद्रोजी तांबे, अरविंद करंबेळकर गावातील बहुसंख्येने उपस्थित ग्रामस्थ मंडळीसह मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल राऊत, विकास राऊत रमेश राऊत, गोविंद सौंदाळकर, सुरेश सरवणकर किसन सौंदाळकर, प्रकाश सौंदाळकर आदी मुंबईकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250