Home नंदुरबार जिल्हा 01 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

01 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

0
The flag will be hoisted by Guardian Minister Hassan Mushrif on May 1st.

(नंदुरबार) महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ शुक्रवार, 01 मे 2026 रोजी सकाळी 08-00 वाजता पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, टोकरतलाव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा मुख्य ध्वजवंदन सोहळा संपन्न होणार आहे, असे जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील मुख्य शासकीय समारंभ सकाळी 08-00 वाजता एकाच वेळी होणार आहे. या सोहळ्यात निमंत्रितांना उपस्थित राहता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 07-15 ते 09-00 या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित करू नये. ज्या कार्यालयास अथवा संस्थेस स्वतःचे ध्वजवंदन करायचे आहे, त्यांनी ते सकाळी 07-15 पूर्वी किंवा 09-00 नंतर करावे.

ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक आणि सर्व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.