Home महाराष्ट्र राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यावर शासनाचा भर...

राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यावर शासनाचा भर राहणार आहे.

1
The government will focus on making the implementation process of solar energy projects in the state easier and faster.

सौर प्रकल्पांना वेळेत गती व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी शासकीय प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत सांगितले.राज्य शासनाने जाहीर केलेल्या अपारंपरिक उर्जा धोरणाबाबत या क्षेत्रातील जाणकारांच्या सूचना आणि हरकतीसंबंधी चर्चा करण्यासाठी अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच कॉन्फड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजचे प्रतिनिधी उपस्थित होते.