सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न

(नंदुरबार) सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, सुलवाडा ता. शहादा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची  आढावा बैठक संपन्न
seva-sankalp-abhiyan-sulwada-health-review-meeting
         बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांचा आणि आरोग्य निर्देशकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक आरोग्य निर्देशकानुसार झालेल्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे, निर्धारित उद्दिष्टे साध्य करणे आणि कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पुढील आठवड्याचे नियोजन करताना सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नियमित अहवाल सादर करावेत तसेच आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांची व सेवा संकल्प अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करणे आणि निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे, या उद्देशाने बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीस आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), एएनएम आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: