छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्यावतीने आयोजित संघ लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, […]
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्यावतीने आयोजित संघ लोकसेवा आयोग
Union Public Service Commission [exam preparation] organized by Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार योगेश टिळेकर, विक्रम काकडे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, अभिमन्यू पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सारथीचे संचालक मधुकर कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

#सारथी

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: