अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई विमानतळावर केले स्वागत

मुंबई: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई विमानतळावर केले स्वागत
Maharashtra Minister Adv. Ashish Shelar welcomed US Secretary of State Marco Rubio upon his arrival at the Mumbai airport.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू काकानूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश मिसाळ, भारतातील अमेरिकेचे राजदूत, अमेरिकेचे महावाणिज्यदूत तसेच अमेरिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: