अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीमध्ये ३ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणचा अतिदक्षता विभाग हा गरजूंसाठी महत्त्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
We will reconstruct the Intensive Care Unit – Guardian Minister Chandrashekhar Bawankule

पालकमंत्री बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मुरके हॉस्पीटल आणि जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे यांनी, रूग्णालयातील आपत्कालीन वेळेत नवजात शिशूंचे जीव वाचविणे ही प्राथमिकता होती. ३६ बालकांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने या सर्व बालकांची प्रकृती आज ठिक झाली आहे. तसेच घटनेनंतर जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी त्याच‍ दिवशी भेट देऊन चौकशी समितीची घोषणा केली आहे. आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्हा स्त्री रूग्णालयाला गेल्या दोन वर्षात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावर्षी या रूग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नाही. रूग्णालयातील प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीकडून छाननी केल्यानंतरच प्रस्ताव नियोजनकडे सादर केले जातात. येत्या कालावधीत अतिदक्षता कक्ष हा एम्सच्या मानकानुसार तयार करण्यात येईल. याठिकाणी जागतिक दर्जाचे उपकरणे बसविण्यात येतील. यात कोणतीही त्रृटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची करतरता भासू देणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे, गंगाराम बेठेकर या पालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच खासगी रूग्णालयांनी शिशूंवर मोफत उपचार केल्याबद्दल आभार मानले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250