विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी

शहादा:-तालुक्यातील म्हसावद येथील सती गोदावरी या शाळेत व्यसन एक समस्या या बाबत मार्गदर्शन करतांना माणक चौधरी यांनी असे प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाचा बळावर मोठी भरारी घ्यावी पण व्यसन करुन देश खिळखिळा करु नये कारण हिंदुस्थानाला जेमतेम स्वातंत्र्य मिळाले आहे ती टिकवण्याची जबाबदारी तरुणांची आहे.
विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी
Students should soar to great heights through the power of knowledge and hard work.

कार्यक्रमास सर्व प्रथम सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव विवेक पाटील डॉ स्वप्नील सोनार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ विवेक नगीन पाटील व पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी जान्हवी वासुदेव साठे, सोनाली भालचंद्र पावरा, मोईन मुसा खाटीक, दानिश जुल्फेकार तेली, नकसाने कुणाल जयदेव, कपिल रविंद्र गोसावी, मोहम्मद रेहान खाटीक, विनंती विक्रम अहिरे, जयश्री एकनाथ राठोड, रोवजी सुभाष मोरे यांना मान्यवरांचा हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरवन्यात आले यावेळी मनोहर चव्हाण, रवींद्र बैसाणे ,महेंद्र करवंदे, प्रवीण पटेल, यांच्या भावेश मगरे भाग्यश्री चव्हाण विनोद ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ स्वप्नील सोनार यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश तुकाराम पाटील व आभार मनोज जाधव यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.