गेल्या ८ दिवसांपासूनचे आंदोलन तीव्र; आयान आणि ओंकार शुगरच्या दरावर ऊस उत्पादक असमाधानी

ऊस दराच्या कोंडीमुळे शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली असून, शेतकऱ्यांनी ऊसतोड व वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रतिटन ३,६५० रुपयांवर तर कारखानदार ३,३०० रुपयांच्या दरावर ठाम आहेत.
गेल्या ८ दिवसांपासूनचे आंदोलन तीव्र; आयान आणि ओंकार शुगरच्या दरावर ऊस उत्पादक असमाधानी
agitation-intensifies-sugarcane-growers-dissatisfied-ayan-omkar-sugar-prices
  • दोन्ही बाजू दोन पाऊल मागे: तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीची ४,२०० रुपयांची मागणी कमी करून ३,६५० रुपयांवर सहमती दर्शवली. दुसरीकडे, कारखानदारांनी ३,३०० रुपये दर देण्याची तयारी दाखवली; मात्र तरीही दरामधील तफावत कायम राहिल्याने अंतिम तोडगा निघू शकला नाही.
  • कारखान्यांच्या ऊस हंगामावर परिणाम: योग्य दर मिळेपर्यंत कारखान्यांपर्यंत ऊस पोहोचू देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. यामुळे कारखान्यांच्या गाळप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • बैठकीतील उपस्थिती: गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बंधू कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आयान शुगर, ओंकार शुगरसह परिसरातील खांडसरी कारखान्यांचे संचालक, साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • कारखान्यांचे दर: शमशेरपूर येथील आयान शुगरने प्रतिटन ३,२५० रुपये तर ओंकार शुगर आणि इतर खांडसरी कारखान्यांनी ३,३०० रुपये दर जाहीर केला आहे; परंतु शेतकरी ३,६५० रुपयांच्या मागणीवर ठाम आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: