तिबेटी व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; महागाई आणि अवकाळी पावसामुळे बाजारात शुकशुकाट

(नंदुरबार) दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात स्वेटर, कानटोप्या, जॅकेट, शाली आणि ब्लँकेटच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे थंडी पडण्यास उशीर झाला असून, शहरातील तळोदा रोडवरील तिबेटी विक्रेते तसेच स्थानिक दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
तिबेटी व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; महागाई आणि अवकाळी पावसामुळे बाजारात शुकशुकाट
tibetan-traders-await-customers-market-desolate-due-to-inflation-unseasonal-rain
    • ई-कॉमर्सचा फटका: ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढल्याने आणि विविध सवलतींसह घरपोच सेवा मिळत असल्यामुळे ग्राहक ई-कॉमर्सला पसंती देत आहेत. याचा थेट आणि मोठा परिणाम शहरातील स्थानिक कापड विक्रेत्यांच्या व्यवसायावर झाला आहे.
    • दरांमध्ये वाढ: कच्चा माल, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्चात झालेल्या बदलांमुळे यंदा स्वेटर, जॅकेट आणि ब्लँकेटच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे विक्रीवर आणखी परिणाम होत आहे.
    • बाजारपेठेची रचना: नंदुरबार शहरात दरवर्षी तळोदा रोड आणि जुनी नगरपालिका परिसरातील मोकळ्या जागेत हे बाजार सजतात. या बाजारांमध्ये गरम कपड्यांचा बहुतांश माल घाऊक उत्पादकांकडून, तर तिबेटी विक्रेत्यांचा माल प्रामुख्याने मुंबई आणि दिल्ली येथून येतो.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: