वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य संशयित युवकाला अटक; दोन महिला कर्मचाऱ्यांवरही गुन्हा

नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग परिसर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात एका २० वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य संशयित युवकाला अटक; दोन महिला कर्मचाऱ्यांवरही गुन्हा
main-suspect-arrested-hostel-student-suicide-case-two-female-staff-booked
  • गुन्हा दाखल आणि अटक: मृत युवतीला त्रास देणारा संशयीत आरोपी युवक विशाल सुरेश पावरा (रा. अंबापूर, ता. शहादा) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वसतिगृहातील कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल दोन महिला कर्मचारी (नलिनी अहिरराव आणि छबुबाई हरिदास डोंगरे) यांच्याविरुद्धही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • गुन्ह्याची कलमे: मृत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि १०६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  • तणावाचे वातावरण: या घटनेनंतर वसतिगृह परिसरात नातेवाईकांनी तीव्र संताप आणि आक्रोश व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त लावला आहे. आमदार आमश्या पाडवी आणि सिताराम पावरा यांनी नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले.
  • पुढील कारवाई: मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) भान्सी करत आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: