ग्रामस्थांच्या एकजुटीतून जलसंधारणाचा आदर्श, आंगलेतील ग्रामस्थांनी उभारला श्रमदानातून बंधारा

राजापूर:-“एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ…” “एकीचे बळ, मिळते फळ!” या उक्ती केवळ पुस्तकात किंवा घरातील खांबावर लिहिण्या पुरत्या न राहता आंगले गावातील ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्ष सिद्ध करुन दाखवून आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून जलसंधारणाचा आदर्श, आंगलेतील ग्रामस्थांनी उभारला श्रमदानातून बंधारा
angle-villagers-build-check-dam-through-shramdaan-water-conservation

आंगले गावातील राऊत वाडी, राऊत वरची वाडी आणि सरवणकर वाडी येथील ग्रामस्थांनी पाण्याचे वाढते महत्त्व आणि भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून एकजुटीने पुढाकार घेत बंधारा उभारण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. आजच्या काळात पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले
ग्रामस्थांची एकजूट आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. गावाच्या विकासासाठी केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेतल्यास लोकसहभागातून किती चांगली कामे उभी राहू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज घातलेला हा एकजुटीचा पाया उद्याच्या पाणीसमृद्ध आंगले गावासाठी निश्चितच मोलाचा ठरेल. या जलसंधारणाच्या लोकहिताच्या कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देण्यात आले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: