नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची दिवाळी गोड; १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५,००० रुपये जमा!
यानुसार 5 नोव्हेंबर 2026 अखेर नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 534 शेतकऱ्यांना 53 कोटी 77 लाख रुपये दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला.
या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले. नाशिक विभागातील 18 लाख 7 हजार 32 शेतकऱ्यांच्या खात्यात 903 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 लाख 7 हजार 284 शेतकऱ्यांना 403 कोटी 64 लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 65 हजार 930 शेतकऱ्यांना 32 कोटी 97 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 4 लाख 8 हजार 635 शेतकऱ्यांना 204 कोटी 32 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 534 शेतकऱ्यांना 53 कोटी 77 लाख रुपये आणि नाशिक जिल्ह्यातील 4 लाख 17 हजार 649 शेतकऱ्यांना 208 कोटी 82 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करून त्यांना अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं

