अनसिल मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी निवड

नाशिक येथे झालेल्या भगवान बिरसा कलासंगम या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अनसिल मामा आदिवासी सोंगाड्या पार्टी केवडीपाडा विभागीय फेरीत निवड करून राज्यस्तरीय होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
अनसिल मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी निवड
ansil-mama-songadya-party-kewadipada-selected-for-state-level-event

राज्यस्तरीय भगवान बिरसा कलासंगम आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे गडचिरोली येथे राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा श्री. ऊईके साहेब, नाशिक अपारायुक्त, श्री. पावरा साहेब आदी मान्यवर उपस्थित होते…. तसेच कलाकार म्हणून अनशील देवीलाल गावित, दिनेश गावित, गुलाबसिंग पाडवी, यादव पाडवी, महेंद्र वळवी, दिनेश मोरे,अनिल वळवी, सिंगा गावित, तसेच सर्व सहकारी कलाकार उपस्थित होते…. हा कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. अशोक पाडवी सर, श्री. लक्ष्मण गावित सर, श्री. सुभाष वळवी सर यांनी मार्गदर्शन केले. व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: