अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव

नंदुरबार तहसील कार्यालयात अनधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या चार जप्त वाहनाचा सोमवार 26 ऑक्टोबर, 2026 रोजी लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती नंदुरबारचे तहसिलदार संतोष डेरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव
Auction of illegal minor mineral transport vehicles on October 26.
लिलावात काढण्यात येणाऱ्या वाहनांचा तपशील:
• ट्रक (MH-20GC-3594): मुल्यांकन रक्कम – 32,54,000/- रुपये
• जेसीबी (MH-41-T-1540): मुल्यांकन रक्कम – 4,17,000/- रुपये
• डंपर (GJ-21-Y-4496): मुल्यांकन रक्कम – 16,24,800/- रुपये
• ट्रक (MH-21-BH-1026): मुल्यांकन रक्कम – 17,00,000/- रुपये
वाहन जप्त मालकांना अनाधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतूक केले बाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आली होती. परंतू संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रकमेचा भरणा अद्याप पर्यंत केला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार ही कारवाई होत आहे. अटकावुन ठेवलेल्या वाहनाचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार यांच्याकडून मुल्यांकन करुन जप्त वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी गृहीत धरून हा लिलाव करुन लिलावातुन प्राप्त होणारा महसूल शासन जमा करण्यात येणार आहे.
या चारही वाहनाचा लिलाव तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे सोमवार 26 ऑक्टोबर, 2026 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहलिसदार संतोष डेरे यांनी केले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: