बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी ‘ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन

नंदुरबार:-बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, नंदुरबार जिल्हा तर्फे रविवार, दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी ‘ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन
bahubhashik-brahman-mahasanghatर्फे-6-saptembar-roji-brahman-wadit-bhavya-vidyarthi-gungaurav-samarambhache-aayojan

महासंघाचे हे सलग 16 वे वर्ष आहे. या सोहळ्यात इयत्ता 10 वी, 12 वी मधील उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच सर्व क्षेत्रातील पदवीधर (Graduation), पदव्युत्तर (Post- Graduate), पी.एचडी. (PhD), संगीत, कला आणि क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या समाज बांधवांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय कोकटे उपस्थित राहून गुणवंतांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी बहुभाषिक ब्राह्मण समाजातील सर्व ज्ञाती बंधू, भगिनी, पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250