बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांचे महाराष्ट्रात आगमन; मंत्री जयकुमार रावल यांनी केले स्वागत

बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर आणि शिष्टमंडळाचे येथे आगमन झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांचे महाराष्ट्रात आगमन; मंत्री जयकुमार रावल यांनी केले स्वागत
belgium-pm-bart-de-wever-maharashtra-arrival-jaykumar-rawal-welcome

याप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस आयुक्त देवेन भारती, बेल्जियमचे भारतीय राजदूत प्रणय वर्मा, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहसचिव अपूर्वा श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेल्जियमचे राजदूत, बेल्जियमचे महावाणिज्यदूत आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250