भगवान सहस्रबाहू अर्जुन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी,महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनेच्या वतीने प्रतिमापूजन व अभिवादन
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान सहस्रबाहू अर्जुन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जावरे यांनी केले. यावेळी प्रमुख विषय मांडताना महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष विजय सोनवणे यांनी भगवान सहस्रबाहू अर्जुन यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या शौर्य, पराक्रम, सामर्थ्य आणि आदर्श जीवनमूल्यांची माहिती उपस्थितांना करून दिली. भगवान सहस्रबाहू अर्जुन यांच्यावर गुरुदेव दत्तात्रेय यांची विशेष कृपा व आशीर्वाद होते.
जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि आदर्श आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. समाजातील तरुणांनी भगवान सहस्रबाहू अर्जुन यांचे विचार, पराक्रम आणि आदर्श आत्मसात करून शिक्षण, संघटन, सामाजिक एकता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित राहणे, सामाजिक बांधिलकी जपणे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला भरत कलाल, देवदास कलाल, अमित कलाल, मनोज जावरे, ॲड. उमेश सोनवणे, राजाराम राणे, राजेश चौधरी यांच्यासह समाजातील मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

