मौजे चौपळे येथे ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ यशस्वी
सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजे चौपळे येथे भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान घेण्यात आले. या अभियानाद्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच आवश्यक प्रमाणपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.
शासकीय योजनांचा लाभ:
• श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना – 5
• संजय गांधी निराधार अनुदान योजना – 6
• प्रधानमंत्री आवास योजना – 3
• इतर योजना – 12
आधार कार्ड – 32, निवडणूक ओळखपत्र – 62, शिधापत्रिका – 42, जात प्रमाणपत्र – 12, उत्पन्नाचा दाखला – 56, रहिवासी/अधिवास दाखला – 8, रेशन कार्ड लिंकिंग लेटर – 4, आयुष्मान भारत कार्ड – 8 तसेच इतर प्रमाणपत्रे – 26 नागरिकांना देण्यात आली.
शेतकरी महिला प्रमाणपत्रासाठी 12 महिलांचे नोंदणीकरण करण्यात आले.
अभियानातून एकूण 288 नागरिकांना लाभ देण्यात आला.
यावेळी म. उपविभागीय अधिकारी व प्रांत अधिकारी नंदुरबार श्री. बी. ए. कापसे, तहसीलदार श्री. संतोष ढेरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुंदर सिंग वसावे, तालुका कृषी अधिकारी श्री. कुणाल ठाकूर, श्री. श्रावण बंजारा, मंडळ अधिकारी श्री. बळीराम चाटे यांच्यासह तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Follow Us:

