लोणखेडा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन!
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाला विशेष महत्त्व असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रयोगाचे अवलोकन व पर्यवेक्षण केले.
प्रमुख उपस्थिती:
या प्रसंगी जिल्हा व तालुकास्तरावरील क्षेत्रीत अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते:
• श्री. किशोर हाडपे (कृषी विकास अधिकारी)
• श्री. देवरे (मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद)
• श्री. अनिल निकम, श्री. योगेश हिवारले, श्री. महेश विसपुते (विस्तार अधिकारी, कृषी, पंचायत समिती, नंदुरबार)
• श्री. प्रशांत चौधरी (विमा प्रतिनिधी)
तसेच संबंधित शेतकरी बंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व:
सध्या नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा बिकट परिस्थितीत पिकांच्या प्रत्यक्ष उत्पादनाचा अचूक अंदाज घेण्यासाठी हे पीक कापणी प्रयोग अत्यंत कळीचे ठरतात. या प्रयोगांमधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे शासनाला पिकांच्या नुकसानीचा योग्य अंदाज येतो, ज्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा इतर अन्य पॅकेज अंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई पारदर्शक पद्धतीने ठरविण्यास मोठी मदत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या महत्त्वाच्या सूचना:
यावेळी मार्गदर्शन करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्यात. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची व योग्य मदत मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे कामकाज अत्यंत अचूक, पारदर्शक आणि विहित पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. यात कोणतीही कसूर किंवा दिरंगाई होणार याची सर्व संबधीतांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
Follow Us:

