रांगेत उभे कशाला राहायचं, मोबाईलवरूनच खत बुक करायचं!

(नंदुरबार) शेतकरी आता दुकानांसमोर रांगेत न उभे राहता थेट आपल्या मोबाईल ॲपवरून अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
रांगेत उभे कशाला राहायचं, मोबाईलवरूनच खत बुक करायचं!
why-stand-in-line-book-fertilizers-directly-from-mobile-phone
    • क्यूआर कोड (QR Code) मान्यता: मोबाईलवर खत बुकिंग केल्यानंतर एक क्यूआर कोड जनरेट होईल, जो ७२ तासांपर्यंत वैध राहील. या ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांना खत खरेदी करणे आवश्यक आहे.
    • वेळेची व चकरांची बचत: यामुळे प्रामुख्याने गावाकडून खत घेण्यासाठी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि दुकानांच्या होणाऱ्या चकरा थांबतील.

 बोगस खतांना आळा आणि इतर फायदे
    • दर्जेदार खते: या डिजिटल पारदर्शकतेमुळे दुय्यम किंवा बनावट दर्जाच्या खतांना आळा बसेल आणि शेतकऱ्यांना दर्जेदार खत मिळेल.
    • खतांचा काळाबाजार बंद: खतांची विनाकारण साठवणूक आणि काळाबाजार या प्रणालीमुळे पूर्णपणे संपुष्टात येईल. शेतकऱ्यांना गरजेनुसार आणि योग्य दरात वेळेवर खत उपलब्ध होईल.

 ‘ॲग्रिस्टॅक’ (AgriStack) योजनेचा फार्मर आयडी आवश्यक
  • खत बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक योजनेचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे.
  • मोबाईल ॲपमध्ये फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक आणि जमिनीची माहिती निवडावी लागेल. त्यानंतर चालू हंगाम, लागवड केलेले पीक आणि आवश्यकतेनुसार खताचा प्रकार निवडून बुकिंग करता येईल.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: