मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची प्रकाशा कन्या शाळेला भेट!

नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा व शामनगर प्रकाशा येथे अभ्यास दौरा केला.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची प्रकाशा कन्या शाळेला भेट!
chief-minister-secretariat-officers-visit-prakasha-kanya-school
या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल शिक्षण आणि भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी केली:
• शैक्षणिक गुणवत्ता: ‘निपुण महाराष्ट्र’ कार्यक्रमाची अंमलबजावणी, भाषा-गणित पेटीचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन क्षमतेची प्रत्यक्ष पडताळणी.
• विद्यार्थ्यांशी संवाद: मुलींच्या आत्मविश्वासाचे आणि शैक्षणिक आकलनाचे अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक व समाधान व्यक्त.
• भौतिक व आरोग्य सुविधा: पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शालेय पोषण आहार आणि स्वच्छता सेवा सप्ताह अभियानाची पाहणी.
• पर्यावरण संदेश: शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहुन आभ्यास समितीने समाधान व्यक्त केले!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: