जुन्या दर्जेदार व दुर्मिळ मराठी नाटकांचे जतन करण्यासाठी निर्मिती संस्थांना अर्ज करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत जुन्या दर्जेदार व दुर्मिळ मराठी नाटकांचे नव्याने सादरीकरण करुन जतन करण्याच्या योजनेत निर्मिती संस्थांना अर्ज करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
जुन्या दर्जेदार व दुर्मिळ मराठी नाटकांचे जतन करण्यासाठी निर्मिती संस्थांना अर्ज करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
Deadline extended till Nov 21, 2026 for production houses to apply for preserving rare Marathi plays

“१. बिकटवाट वहिवाट (लोकनाट्य) २. एक शून्य बाजीराव ३. देवमाणूस (संगीत नाटक) ४. महाराणी पद्मिनी ५. राजा ओयदिपौस ६. सारी रात्र (अनुवाद-बंगाली नाटक) ७. माझा खेळ मांडू दे” या सात नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. ही नाटके नव्याने सादर करुन जतन करावयाची आहेत. यासाठी निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येणार असून हे काम २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे.

कमीत कमी दहा व्यावसायिक नाटकांची निर्मिती केलेल्या आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत किमान दहा वर्षे सहभाग घेतलेल्या निर्मिती संस्थांनाही अर्ज करता येईल. हौशी संस्थांसाठी राज्य नाट्य स्पर्धेत निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, संगीत इ. पैकी किमान तीन पारितोषिके मिळालेली असावीत.

नोंदणीकृत संस्थांनी त्यांचे प्रस्ताव पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे १५ नोव्हेंबर २०२६, पर्यंत सायं. ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अथवा pldaclassicaldrama@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याबाबत ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आले होते. हे अर्ज करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून याबाबत आवश्यक माहिती http://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून कळविण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: