धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

नंदुरबार:-प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे क्षेत्राशी संबंधित टपाल सेवा किंवा कामकाजाबाबतच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही किंवा त्यावर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी 12 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता धुळे येथे मासिक डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
dhule-dak-adalat-organized-october-12

अशी माहिती धुळे डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या डाक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर आदी सेवांशी संबंधित तक्रारींचा समावेश असेल. तक्रार करताना त्यामध्ये सर्व आवश्यक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम तसेच तक्रार पाठविल्याचा तपशील यांचा समावेश असावा. संबंधितांनी डाक सेवेसंदर्भातील आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे – 424001 या पत्त्यावर 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने, अतिरिक्त प्रतीसह पाठवावी, असेही धुळे डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी कळविले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: