वाहनधारकांनो नोंद घ्या! १ एप्रिल २०२७ पूर्वी डम्पर-टिपरवर कव्हरिंग व ऑडिओ-व्हिज्युअल यंत्रणा आवश्यक, अन्यथा दंडात्मक कारवाई!
(नंदुरबार) सर्व डम्पर आणि टिपर वाहनधारकांनी १ एप्रिल २०२७ पूर्वी आपल्या वाहनांवर कव्हरिंग यंत्रणा व ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट सिस्टीम बसवून घेणे अनिवार्य आहे.
-
- अधिकृत घोषणा: केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारणेनुसार ही माहिती नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी दिली आहे.
नियमांचे स्वरूप आणि अंमलबजावणी
-
- कव्हरिंग यंत्रणा: वाहन रस्त्यावर चालू असताना लोड बॉडीवरील माल पूर्णपणे झाकला जाईल अशा पद्धतीची विद्युत, हायड्रॉलिक अथवा यांत्रिक कव्हरिंग यंत्रणा बसवणे आवश्यक आहे.
- अलर्ट सिस्टीम: लोड बॉडीचे कव्हर उघडे किंवा असुरक्षित स्थितीत असल्यास चालकाला तात्काळ सूचना मिळण्यासाठी केबिनमध्ये ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट सिस्टीम बसवणे गरजेचे आहे.
कारवाईचा इशारा
-
- विहित मुदतीनंतर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे.
Follow Us:

