विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासासाठीही भर द्यावा : प्राचार्य नूतनवर्षा वळवी

नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मातापालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासावरही भर देण्याची गरज व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासासाठीही भर द्यावा : प्राचार्य नूतनवर्षा वळवी
Emphasis should also be placed on the social development of students: Principal Nutanvarsha Valvi

सभेत शाळेतील विविध सुविधांची पालकांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला तसेच शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250