विज्ञापित

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करावा उप आयुक्त विनोद धनगर

(नंदुरबार) जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांनी त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2026 हा संदर्भ दिनांक निश्चित करून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2026 मध्ये अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उप आयुक्त विनोद धनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करावा उप आयुक्त विनोद धनगर
government-employees-comprehensive-database-update-vinod-dhangar
        शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2026 अद्ययावत करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती भरण्याच्या सूचना तसेच माहिती कशी भरावी याबाबतचा तक्ता संबंधित DDO लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसारच माहिती भरावी.
माहिती भरण्यासाठी मागील वर्षीचे युजर आयडी व पासवर्ड कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयांसाठी लॉगिन आयडी व पासवर्ड आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयास सादर करून ते प्राप्त करून घ्यावेत.
नोव्हेंबर 2026 मध्ये देय व डिसेंबर 2026 मध्ये अदा होणारे वेतन देयक कोषागार कार्यालयात सादर करताना, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नंदुरबार यांच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2026 अद्ययावत केल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय संबंधित वेतन देयक कोषागार कार्यालयात स्वीकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नंदुरबार, नवीन नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नंदुरबार येथे अथवा दूरध्वनी क्रमांक 02564-210044 वर संपर्क साधावा. तसेच सांख्यिकी सहायक मदन मोरे (मोबाईल क्र. 9834860493) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उप आयुक्त विनोद धनगर यांनी केले आहे.
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: