प्राण्यांना फटाक्यांचा त्रास द्याल तर थेट तुरुंगात जाल; भारतीय न्याय संहिता कलम ३२५ नुसार ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद

(नंदुरबार) प्राण्यांच्या शेपटीला फटाके बांधणे किंवा पेटते फटाके त्यांच्या अंगावर फेकणे असे प्रकार घडतात. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशा घटना समोर आल्या आहेत. कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला ठार मारणे, अपंग करणे किंवा छळ करणे हा गंभीर गुन्हा असून त्यात ५ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.
प्राण्यांना फटाक्यांचा त्रास द्याल तर थेट तुरुंगात जाल; भारतीय न्याय संहिता कलम ३२५ नुसार ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद
Harassing animals with firecrackers can land you straight in jail; provision for 5-year imprisonment under Section 325 of Bharatiya Nyaya Sanhita.
  • प्राणी आणि पक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम: फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे पाळीव आणि भटके प्राणी घाबरून सैरावैरा पळतात, वाहनांखाली येऊन अपघातग्रस्त होतात किंवा बिथरून आक्रमक होतात. काही संवेदनशील व वृद्ध प्राण्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येऊ शकतो. तसेच रात्रीच्या वेळी आवाज व विषारी धुरामुळे पक्ष्यांचा गुदमरून किंवा इमारतींना धडकून मृत्यू होतो आणि रॉकेटसारख्या फटाक्यांमुळे झाडांवरील घरटी जळून खाक होतात.
  • मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक: जर कोणताही प्राणी किंवा पक्षी फटाक्यांमुळे जखमी झालेला आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधावा. प्राणी उंचावर किंवा दुर्गम ठिकाणी अडकला असल्यास १०१ या अग्निशमन दलाच्या क्रमांकावर कळवून त्याला जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी न्यावे.
  • प्रशासनाचे आवाहन: नंदुरबारचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहायक आयुक्त संजय खाचणे यांनी नागरिकांना प्राण्यांच्या जवळ फटाके न वाजवण्याचे आवाहन केले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: