मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी नंदुरबारमध्ये सहाय्यता कक्ष स्थापन, 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रत्नाकर राजम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राज्यातील उपलब्ध जलक्षेत्रांचा प्रभावी वापर करून मत्स्यसंवर्धनाला चालना देणे, मत्स्योत्पादनात वाढ करणे तसेच मच्छिमार व मत्स्यकास्तकारांचे उत्पन्न वाढवून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे, या उद्देशाने शासनामार्फत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शाश्वत पद्धतीने मत्स्योत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, निर्यातमूल्य वाढविणे, मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे, मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे तसेच रोजगारनिर्मितीसह त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावणे हा आहे. या सहाय्यता कक्षासाठी ज्ञानबा लक्ष्मण पाबळे, कनिष्ठ लिपिक यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक मच्छिमार सहकारी संस्था, मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करावेत. योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9604490809 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रत्नाकर राजम यांनी केले आहे.

