“जांगठीत चुलीच्या ठिणगीतून घराला आग; पशुधन होरपळले; साडे पाच लाखाचे नुकसान”

अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी (पाटीलवाडा) येथे शेतकरी तुमड्या पारशी वळवी यांच्या घरात चूल पेटलेली असताना चुलीतून लाकडाची ठिणगी उडाल्याने घराला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले.
“जांगठीत चुलीच्या ठिणगीतून घराला आग; पशुधन होरपळले; साडे पाच लाखाचे नुकसान”
fire-jangthi-cattle-burnt-loss-5-lakhs
• नुकसान:
• २ लाख ८० हजार रुपये किमतीचे लाकडी साहित्याचे घर जळाले.
• ८० हजार रुपये किमतीचे धान्य (ज्वारी, मका, उडीद) जळून खाक झाले.
• घरात ठेवलेली २० हजारांची रोकड जळाली.
• पशुधनाची हानी: १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन आगीत होरपळले. यामध्ये एक बैल, तीन गाई आणि दोन वासरू जळून मरण पावले.
• एकूण नुकसान व नोंद: या आगीत शेतकऱ्याचे एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, मोलगी पोलीस ठाण्यात या अग्न्युत्पाताची नोंद करण्यात आली आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: