महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांचे गौरवोद्गार जळगाव परिमंडळात आंतरराष्ट्रीय लेखा दिन उत्साहात साजरा

जळगाव/धुळे/नंदुरबार : महावितरणच्या आर्थिक व्यवस्थेला सक्षम आणि गतिमान ठेवण्यात वित्त व लेखा विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वीज महसुलाचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकता, जमा-खर्चाचा ताळमेळ, देयकांचे व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त राखण्यात या विभागाचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद‌्गार मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी काढले.
महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांचे गौरवोद्गार जळगाव परिमंडळात आंतरराष्ट्रीय लेखा दिन उत्साहात साजरा
mahavitaran-accounts-department-contribution-chief-engineer-i-a-mulani-jalgaon-international-accounting-day

आंतरराष्ट्रीय लेखा दिनानिमित्त वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अभियंता मुलाणी बोलत होते., अधीक्षक अभियंता मदन सांगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता (प्रशासन) किरण महाजन, कार्यकारी‍ अभियंता चेतन नंदनवार, प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) गणेश लिधुरे, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमित सोनवणे, व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) देवेंद्र कासार यांच्यासह सर्व विभागांच्या उपव्यवस्थापकांसह वित्त व लेखा विभागाचे कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी महावितरणच्या कामगिरीचा आढावा घेतला. मागील काही कालावधीत वीजबिलांसंदर्भातील तक्रारींवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत व दीर्घकाळ प्रलंबित वीजबिलांची वसुली करण्यावर आगामी काळात विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘१०० टक्के अचूक मीटर रीडिंग, अचूक बिलिंग आणि अचूक बिलवाटप’ या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केल्यास कंपनीचा महसूल वाढवून महावितरणला सातत्याने नफ्यात ठेवणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुलाणी यांनी केले.

महावितरणच्या आर्थिक स्थैर्य आणि प्रगतीमध्ये वित्त व लेखा विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करून त्यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचे अचूक लेखांकन, महसुलाचे नियोजन, आर्थिक शिस्त आणि विविध विभागांशी समन्वय साधत आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची जबाबदारी वित्त व लेखा विभाग पार पाडत आहे. जळगाव परिमंडलात वित्त व लेखा विभाग आणि प्रशासन यांच्यात चांगला समन्वय असून, कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासोबतच ग्राहकांपर्यंत पोहोचून कंपनीचा महसूल वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मुलाणी यांनी केले. 

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: