नंदुरबारमध्ये ‘बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह’; नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर होणार कायदेशीर कारवाई

(नंदुरबार) बालदिनाचे औचित्य साधून १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात 'बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह' राबवला जात आहे. यात जनजागृतीसोबतच नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिली.
नंदुरबारमध्ये ‘बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह’; नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर होणार कायदेशीर कारवाई
nandurbar-anti-child-labour-week-legal-action-against-violators
  • शिक्षेची तरतूद: बालकामगार सुधारणा अधिनियम २०१६ नुसार, १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवल्यास २० ते ५० हजार रुपये दंड किंवा कारावास, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास १ ते ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
  • प्रशासनाचे आवाहन: दुकाने, हॉटेल्स, विटभट्ट्या, खडीक्रशर किंवा चहाच्या टपऱ्यांवर बालकामगार ठेवू नयेत. बालकांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची संधी देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: