मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प
गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ, चोपडा जि. जळगाव यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय देवमोगरा पुनर्वसन येथे ‘मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महिला मंडळाचे प्रतिनिधी व मार्गदर्शक डी डी चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान व आपुलकी निर्माण व्हावी, तसेच मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, मराठीतील उत्तम पुस्तक वाचणे आणि मराठी भाषेचा आदर करणे मराठी पुस्तके वाचण्याची सवय लावून घेणे या उद्देशाने उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मराठी भाषेचे महत्त्व, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि मातृभाषेचे संवर्धन याविषयी आपले विचार व्यक्त केले. उपस्थिताकडून
‘” मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया ” या संदेशातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि प्रचार-प्रसाराचा संकल्प करण्यात आला.‘मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया’चा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमानाची भावना निर्माण होऊन मातृभाषेच्या जतन व संवर्धनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, आर पी महिरे तसेच गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळाचे पदाधिकारी व शिक्षक दिलवर वसावे, योगेश्वरी पाटील, जुराबाई वसावे, रोशनी पाडवी, रफिक पिंजारी, निलेश चौधरी, भानुदास चौधरी, संदीप चौधरी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश चौधरी यांनी केले.

