मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा डंका; पळसून, तळवे व वावडी बु. ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत!

ग्रामीण विकास आणि उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीच्या जोरावर नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा डंका; पळसून, तळवे व वावडी बु. ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत!
Nandurbar district shines in Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan; three gram panchayats win state awards.
         महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत बाजी मारली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दि. ०६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील विभाग आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विजेत्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत:
• प्रथम क्रमांक (₹५० लाख): ग्रामपंचायत पळसून, ता. नवापूर
• द्वितीय क्रमांक (₹३० लाख): ग्रामपंचायत तळवे, ता. तळोदा
• तृतीय क्रमांक (₹२० लाख): ग्रामपंचायत वावडी बु., ता. नवापूर
जिल्ह्याला मिळालेल्या या उल्लेखनीय यशामागे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयकुमार कुसूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सूक्ष्म नियोजन आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
या यशाबद्दल तिन्ही विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार केवळ आर्थिक बक्षीस नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली सामूहिक मेहनत, पारदर्शक कारभार आणि लोकसहभागाचा सन्मान आहे. सक्षम आणि समृद्ध ग्रामपंचायतींच्या दिशेने नंदुरबार जिल्ह्याची ही वाटचाल अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: