नंदुरबार येथील मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीसह २८ मंडळांचा सहभाग
१० दिवसांच्या गणेशोत्सवानंतर बाप्पांना शुक्रवारी निरोप दिला जाणार आहे. नंदुरबारमधील मुख्य विसर्जन मिरवणुकीत २८ मोठी मंडळे आणि मानाचे 'दादा व बाबा गणपती' सहभागी होणार आहेत. याशिवाय जिल्ह्यात इतर लहान-मोठ्या मंडळांसह एकूण २०० पेक्षा अधिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी निघणार आहेत.
- हरिहर भेट: विसर्जन मिरवणुकीतील मुख्य आकर्षण असलेली मानाच्या ‘दादा व बाबा गणपतीची हरिहर भेट’ ही जळका बाजारात रात्री १० वाजेपर्यंत घडवून आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. ही भेट पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून गणेशभक्त गर्दी करतात.
- कडक पोलीस बंदोबस्त: विसर्जन मिरवणूक मार्गावर सुरक्षेची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी १ पोलीस अधीक्षक, १ अप्पर पोलीस अधीक्षक, ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ५६ एपीआय/पीएसआय, ७५२ पोलीस कर्मचारी, ८५० होमगार्ड, ८ स्ट्रायकिंग फोर्स, ९ आरसीपी, १ क्यूआरटी आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे.
- हायटेक देखरेख: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि चोख पाळत ठेवली जाणार आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचे बारीक लक्ष असेल.
- प्रशासकीय सुविधा: मिरवणूक मार्गावरील विजेच्या लटकत्या तारा व केबल्स काढण्यात आल्या असून अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवला जाणार आहे. तसेच पालिका प्रशासनाने लहान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी व्हॅली नगर येथे कृत्रिम तलाव तयार केला आहे.
Follow Us:

