नंदुरबार जिल्ह्यात‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित,रोजगारासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी

नंदुरबार:-ग्रामीण मजुरांचे रोजगारासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’ कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित,रोजगारासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी
nandurbar-mulvat-migration-control-room-mitali-sethi

राज्य शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता, 2016 अन्वये राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी या सर्व सहा तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) अंतर्गत ग्रामीण मजुरांना त्यांच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. या योजनेतंर्गत जलसंधारण, मृद व जलसंधारण, शेतीपूरक कामे, वृक्षलागवड, फळबाग विकास, चारा विकास आदी अनुज्ञेय कामांना गती देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरजू मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देतानाच जलसंधारणाच्या माध्यमातून टिकाऊ मालमत्ता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित,
ग्रामीण मजुरांचे रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’ हेल्पलाईन क्रमांक  (02564) 299544 कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत मजूर बांधवांच्या रोजगाराच्या मागण्या, तक्रारी व अडचणी नोंदवून संबंधित ग्रामपंचायती आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच प्राप्त मागण्या व तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
मजूर बांधवांसाठी हेल्पलाईन सुविधा, जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’ (02564) 299544 च्या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. या हेल्पलाईनवर संपर्क साधून रोजगाराची मागणी नोंदविणे. रोजगार उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रार नोंदविणे. रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध कामांची माहिती घेणे. रोजगाराशी संबंधित इतर अडचणी व तक्रारी नोंदविणे आदी माहिती अथवा मदत घेता येईल.
रोजगारासाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, दुष्काळी परिस्थितीत रोजगाराच्या शोधात इतर राज्यात स्थलांतर करण्यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामस्थ व मजूर बांधवांनी ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’शी संपर्क साधून आपल्या रोजगाराची मागणी नोंदवावी, स्थानिक पातळीवर उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे. असे महाराष्ट्र रोजगार हमी (विकसित भारत- रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेच्या उपजिल्हाधिकारी उषाराणी देवगुणे- दहिकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: