नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

ग्रामीण मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
nandurbar-mulwat-migration-control-room
नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
        ग्रामीण मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची आवश्यकता असताना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, रोजगाराशी संबंधित अडचणी व तक्रारींची नोंद घेणे तसेच संबंधित ग्रामपंचायत व यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षामार्फत —
  •  रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी मार्गदर्शन व मदत
  •  उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती
  •  रोजगाराशी संबंधित अडचणी व तक्रारींची नोंद
  •  ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांशी समन्वय
  • रोजगार उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही
  • रोजगाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उपजीविकेच्या संधी बळकट करण्यासाठी प्रयत्न
याअंतर्गत जलसंधारण, मृद व जलसंधारण, शेतीपूरक कामे, वृक्षलागवड, फळबाग विकास, चारा विकास आदी अनुज्ञेय कामांना गती देण्यावर भर देण्यात येत आहे.
रोजगाराची गरज किंवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास संपर्क साधा:
मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष हेल्पलाइन
02564-299544
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: