नंदुरबारमध्ये सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ७ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक!
सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सदर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन गुन्ह्याचा पुढील तपास करुन आरोपीताना जेरबंद करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एक पथक स्थापन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील तार चोरोच्या गुन्ह्यांचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रीहट्टी शिवारातोल सुझलॉन टॉवर क्र. K- 355 वर झालेला दरोडा हा धुळे जिल्ह्यातील जामदा, हट्टी येथील राहणारे अनमोल अशोक भोसले, मच्छिंद्र पुंडलिक मासुळे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने केलेलो आहे, असे समजल्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदरची माहिती पथकाला कळवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील आरोपीतांचा शोध घेवून अनमोल अशोक भोसले वय- 26 वर्षे रा. जामदा ता. साक्री जि. धुळे, मच्छिद्र पुंडलिक मासुळे वय-29 वर्षे, रा. हट्टी ता.साक्री जि. धुळे, शकील लतीफ खाटीक वय-39 वर्षे, बंदा ड्रायव्हर रा. गरीब नवाज कॉलनी दोंडाईचा ता. दोंडाईचा जि. धुळे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा दरोडा ही त्यांचा आणखी इतर साथीदाराच्या मदतीने केली असलेबाबत सविस्तर माहिती दिली, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून 3 लाख रुपये किमतीची 300 किलो सुजलीन टावरमध्ये वापरण्यात येणारी काळ्या रंगाची तांब्याची तार 4 लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण एकूण 7,00,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना देखील लवकरात लवकर ताब्यात घेवून त्यांच्याकडून देखील मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सांगितले. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटोल, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटोल, मुकेश तावडे, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, दिनेश वसूले, योगेंद्र सोनार, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, अभय राजपुत, विनोद पाटील, अनिल नागरगोजे यांच्या पथकाने केली आहे.

