विज्ञापित

राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न

नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम खडकी तालुका धडगाव येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न
national-nutrition-maha-programme-held-at-khadki-in-presence-of-mla-amsha-padvi

राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज पटले, गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, जिल्हा महिला बालविकास कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, माजी सरपंच सिताराम पावरा, गटविकास अधिकारी नाईक, सी डी पी ओ मधुकर जाधव, प्रा दिनेश खरात, आर एफ ओ रोडे,  सरपंच राकेश पावरा, जयसिंग चौधरी, प्र तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निकुंभ, महिला बाल विकास विभागातील सुपरवायझर अंगणवाडी सेविका मदतनीस, परिसरातील सरपंच, बचत गटाच्या महिला आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. यावेळी पारंपारिक नृत्य सादर करून प्रमुख अतिथींच स्वागत सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर निकाळजे, प्रस्ताविक सीडीपीओ मधुकर जाधव, यांनी तर आभार सिताराम पावरा यांनी मानले.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: