विज्ञापित

साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर

(नाशिक):-माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापराने आजची पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे. अशावेळी साने गुरुजींसारख्या ज्ञान आणि संस्काररूपी विचार पेरणाऱ्या गुरुजनांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी केले. शंकराचार्य कुर्तकोटी संकुलात गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित साने गुरुजी शिक्षक पुरस्कार सोहळा श्री.सौदागर यांच्या हस्ते संपन्न झाला.
साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर

सोहळ्याचे अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, प्रमुख वक्ते सावळीराम तिदमे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, गिरजा महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा शितल कुयटे, राज्य सरचिटणीस भारती निकम, उपाध्यक्षा भाग्यश्री चौधरी मंचावर उपस्थित होते. सौदागर पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शाळेबरोबरच समाजातल्या लोकशिक्षकांनी आपल्या प्रत्येकाला घडवलं आहे. कवी आणि गीतकार म्हणून जडणघडण होताना शब्दांचा वापर योग्यपणे करत गाण्यांना आकार देता आला, असे सांगून त्यांनी ‘नमस्कार माझा गुरू माऊलीला; तुझ्या गौरवाने आनंद झाला.’ ही प्रार्थना सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. साने गुरुजी पुरस्कारप्राप्त शिक्षक नामदेव सोनवणे (निफाड), नितीन गुंजाळ (निफाड), प्रशांत देवरे (सटाणा), रेखा बाविस्कर (येवला), हेमलता सोनवणे (देवळा), सचिन मोरे (सिन्नर), दिनेश देवरे (इगतपुरी), विनोद आडेप (सिन्नर), झांबरू जोपळे (सुरगाणा), समाधान खैरनार (मालेगाव), योगिता कुमावत (येवला), हिरामण भोये (त्र्यंबकेश्वर), प्रकाश माळी (मालेगाव), वैशाली वालझाडे (सिन्नर), संजीव आहेर (देवळा), श्रीकांत पवार (सुरगाणा), प्रज्ञा गायकवाड (नाशिक), सागर सोळुंके (नांदगाव), आनंदा पवार (पेठ), जयश्री पवार (नाशिक), ललिता साबळे (पेठ), अब्रार मणियार (कळवण), माधुरी धनवटे (देवळाली कॅम्प), रेखा जाधव (चांदवड), संगीता आढाव (नाशिक), प्रा.प्रतिभा रौंदळ (सटाणा), वैशाली अहिरे (मालेगाव), नसरीन पठाण (इगतपुरी), प्रा.तृप्ती काकुळते (सटाणा), शंकर अहिरे (येवला), राजेंद्र ओतारी (सटाणा) यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांसह प्रमुख वक्ते सावळीराम तिदमे यांनी आपल्या भाषणात गुरूंच्या संस्कारांनीच आपण घडलो आहोत. हे संस्कार पुढच्या पिढीला देत आपण वाटचाल करावी, असे आवाहन केले. पुरस्कार निवड समितीचे खंडू मोरे, रतन पिंगट, माधुरी पाटील, शिवाजी कोल्हे, मंदाकिनी शेलार, संजय देहाडे, विलास सोनवणे यांनाही सन्मानित करण्यात आले. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी स्वागत केले. माधुरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. खंडू मोरे यांनी मानपत्र वाचन केले. रतन पिंगट यांनी आभार मानले. अशोक कुमावत यांनी सूत्रसंचालन केले.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: