पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी

संगमेश्वर:-क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने न्यू इंग्लिश स्कूल ताम्हाणे माध्यमिक विद्यालयात 17 वर्षीय वयोगटातील मुले व मुली शालेय हॉलिबॉल स्पर्धा पार पडली या स्पर्धामध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर मधील मुलींच्या संघाने अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीयम स्कूल देवरुख या विद्यालया बरोबर अंतिम सामना झाला या सामन्यात पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर या विद्यालयाने विजय मिळविला. शिक्षक संदीप कोदारे यांचे मार्गदर्शन लाभले.
पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी
pandurang-govind-mahadik-school-volleyball-sangameshwar

या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, युगंधरा राजशीर्के, डॉ इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक,जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर, शालेय समिती चेअरमन संभाजी महाडिक, सर्व सदस्य, मुख्याध्यापक बी. एच. चंदनशिवे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक- ग्रामस्थ यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. या संघाची कर्णधार  कु. तनया करंजकर तसेच इतर खेळाडू, प्राप्ती जाधव, प्रगती दुदम, श्रावणी धनावडे, साक्षी भायजे, तेजस्वी करंजकर, भक्ती जाधव, त्रिवेणी कदम, तन्वी मांडरकर आदी सहभागी झाले होते. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन कुमारी प्रगती दुदम हिने केले व सगळ्यांनी तिच्या खेळाचे कौतुक केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: