विज्ञापित

अंधेरी सब-वे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठकीत दिल्या. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या. विज्ञापित मोगरा नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाल्याचा प्रवाह वळवणे, पाणी साठवण टाकी उभारणे तसेच नाल्याची क्षमता वाढवणे यांसारखे महत्त्वाचे पर्यायांचा विचार करावा. या प्रकल्पासाठी […]
अंधेरी सब-वे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Permanent solutions will now be taken to address the problem of waterlogging during the monsoon season in the Andheri subway area.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठकीत दिल्या. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.

विज्ञापित

मोगरा नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाल्याचा प्रवाह वळवणे, पाणी साठवण टाकी उभारणे तसेच नाल्याची क्षमता वाढवणे यांसारखे महत्त्वाचे पर्यायांचा विचार करावा. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबई कडून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जात असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

या उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाकडून यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: