महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश: प्रत्येक आदिवासी जिल्ह्याला मिळणार स्वतंत्र आधार नोंदणी संच

आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली आधार कार्डे आणि जन्म दाखले उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश: प्रत्येक आदिवासी जिल्ह्याला मिळणार स्वतंत्र आधार नोंदणी संच
revenue-minister-chandrashekhar-bawankule-directs-separate-aadhaar-kits-tribal-districts
  • स्वतंत्र आधार नोंदणी संच: राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र आधार नोंदणी संच (Aadhaar kits) उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल.
  • दावे व वनहक्क निपटारा: वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी विशेष कालबद्ध मोहीम राबवली जाईल. अपूर्ण किंवा नाकारलेल्या दाव्यांची पुनर्तपासणी करून आदिवासींना न्याय दिला जाईल.
  • सुलभ कागदपत्रे व पुरावे: केवळ तांत्रिक कागदपत्रांअभावी आदिवासी बांधव योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी उपग्रह प्रतिमा (Satellite images) आणि तांत्रिक माहितीचा पुरावा म्हणून वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • पुनर्वसन आणि समन्वय: ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, रायगड आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील वेठबिगारीतून मुक्त झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. पुढील ६ महिन्यांत या कामांचा आढावा घेतला जाईल.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: