सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन
या वाद्यवृंदाचे उदघाटन 30 ऑगस्ट 2026 रोजी उप सरपंच विलास जाधव यांच्या राहत्या घरी झाले. विदया पूजन प्रभारी पोलीस पाटील सयाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कलाकारांना हार्दिक शुभेच्या देत या वादय वृंदाचा ताफा आपल्या कलेची यशोगाथा पुढे नेईल यात शंका नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. अविरत्न म्युझिकल्स बिट्स या टि शर्ट्सचे वाटप विलास जाधव यांच्या हस्ते झाले. अथक प्रयत्नांती उभ्या केलेल्या वाद्यवृंदाचे कलाकार विराज जाधव, सम्यक जाधव, तुषार जाधव, अनिष्का जाधव, निर्मिती जाधव, संकल्प जाधव, प्रसनजित जाधव, सागर जाधव, साहिल पालेकर, गौरेश धुळप, शेखर तावडे आणि प्रज्वल यादव आदी असून या नूतन वाद्यवृंदाचे मान्यवरांनी अभिनंदन केले असून पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अविरत्न म्युझिकल्स वाद्यवृंद (येरवड) यांच्याशी संपर्क साधावयाचा असल्यास विराज जाधव – ८५९१५६६८२९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

