बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न
शहादा:-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात संस्कृत सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हिंदी विभाग प्रमुख प्रा.धीरेंद्र यादव होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी.एस.करंके यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.धीरेंद्र यादव यांनी संस्कृत ही ज्ञानाची भाषा कशी आहे संस्कृत भाषेमुळे विविध ग्रंथातून कमीत कमी शब्दात ज्ञानाचा प्रवाह कसा टिकून आहे आणि त्यामुळे आज विविध शास्त्रात मुल्यात्मकता कशी आहे.याविषयी अनेक ग्रंथातून हा प्रवाह आजपर्यंत कसा टिकून राहिला त्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथाची उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही संस्कृत भाषेचे महत्व व त्यातील विविध साहित्यिकांनी केलेले योगदान हे वर्तमान काळात देखील किती महत्त्वाचे आहे याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले. आभार डॉ. के.बी.पाटील केले सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

