वाशिमच्या मालेगावमध्ये उभारणार अत्याधुनिक मासळी बाजार आणि शीतगृह; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार, शीतगृह, मासळी विक्री केंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मालेगाव आणि सांगली येथील मासळी बाजाराचे काम अत्याधुनिक आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
वाशिमच्या मालेगावमध्ये उभारणार अत्याधुनिक मासळी बाजार आणि शीतगृह; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
State-of-the-art fish market and cold storage facility to be set up in Malegaon, Washim; Minister Nitesh Rane issues directives.

बैठकीला मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांगली मासळी बाजाराबाबतच्या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता मोहपात्रा उपस्थित होत्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250